गंगाखेड येथे रामनवमी निमित्त ढोल-ताशांचा गजरात भव्य पालखी सोहळा पार पडला

गंगाखेड रामनवमी/ विनायक आंधळे : यंदाची रामनवमी (RamNavami) सर्वांसाठीच खूप खास होती. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य असं मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच रामनवमी देशभरात नागरिकांनी साजरी केली. रामनवमी निमित्त गंगाखेड (Gangakhed) शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे भव्य अश्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जल्लोष साजरा केला..!

श्रीरामनवमीनिमित्त गंगाखेड शहरात ढोल-ताशांचा गजरात व भजनाने भव्य असे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता श्री मोठा मारुती मंदिर गोदातट येथुन पालखीस सुरुवात झाली व पुढे मोठा बालाजी मंदिर,टोले गल्ली, पोस्ट ऑफिस, भगवती चौक, श्रीराम चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक या मार्गाने जाऊन नगर परिषद प्रांगणात आरती व महाप्रसादाने पालखी सोहळा पार पडला. विशेषत: चिमुकल्या बालकांचा सहभाग महत्वाचा होता, ठिकठिकाणी रामभक्त माता-भगिनिंनी रांगोळी काढुन, पुष्पवृष्टी व आरती करुन पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे आयोजन हे श्रीराम पालखी सोहळा समितीतर्फे करण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात