पक्षाची भरभराट व्हावी यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये होम-हवन

Pune News : पक्षाची भरभराट व्हावी, पक्षातील गटातटात एकी व्हावी, यासाठी ‘सर्व सिद्धी’ पुजा करून होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या ऐतिहासिक अशा काँग्रेस भवनमध्ये (Congress Bhavan ) घडली आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान अध्यक्षांच्या केबिनच्या शेजारील सभागृहात होम-हवन झाले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. saam tv ने याबाबत वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे लोकांना कळू नये याची काळजी देखील घेण्यात आली होती.दुपारच्या वेळी हे सर्व होम-हवन आणि पूजा उरकण्यात आली. अध्यक्षांच्या केबिनच्या शेजारीच हे होम-हवन करण्यात आले असं सांगण्यात येत आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसने अशा पद्धतीने पक्षाची भरभराट व्हावी यासाठी होम-हवन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.