ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन वेगळे होणार? स्वत: ‘ती’ पोस्ट करत अभिनेत्रीने चर्चांना दिला वाव

Aishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्व काही ठीक  नाहीये, त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. अशातच ऐश्वर्याने तिचा वाढदिवस, करवा चौथ मुलगी आराध्यासोबत साजरा केला, तर तिने एकटीने दिवाळीही साजरी केली. आता ऐश्वर्या रायच्या नव्या पोस्टने या प्रकरणाला वाव दिला आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे आता असे मानले जात आहे की दोघेही वेगळे होणार आहेत. ती पोस्ट काय होती आणि हे जोडपे खरोखर वेगळे होणार आहेका ? ते जाणून घेऊया. …

…तर ही ऐशची पोस्ट होती
ऐश्वर्या राय बच्चनने तिचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते. ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्या आणि दिवंगत वडिलांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या वडिलांसोबतचा स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला आहे आणि दुसर्‍या फोटोमध्ये ती आई आणि मुलीसोबत दिसत आहे तर मागे तिच्या वडिलांचा फोटो भिंतीवर टांगलेला आहे आणि त्यावर हार देखील दिसत आहे. परंतु सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, ऐशने अभिषेकसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही.

पोस्ट शेअर करताना ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लव्ह यू सदैव, प्रिय बाबा-आज्जा, सर्वात गोड, दयाळू, काळजी घेणारा, मजबूत, उदार आणि उमदा… तुझ्यासारखा कोणी नाही… कधीच नाही. तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! स्मरणार्थ प्रार्थना, आम्हाला तुमची खूप आठवण येते.’

बच्चन कुटुंबातील पॉवर कपल विभक्त होणार?
तिने हे फोटो पोस्ट करताच तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या विभक्त (Aishwarya Rai and Abhishekh Bachchan Divorce) झाल्याची चर्चा जोर धरू लागली. एका यूजरने लिहिले की, ‘प्रिय ऐश.. तू कधीच आराध्या आणि अभिषेकसोबत फोटो का काढत नाहीस.. तुझ्या फॅमिलीचे फारच कमी फोटो आहेत, त्यामुळे तुम्ही वेगळे झालेत का..?’ आम्ही तुम्हाला सांगतो, या फक्त अफवा आहेत आणि याला कोणतीही पुष्टी नाही.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा