हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट, एक कोटीत खटला निकाली

Honey Singh Divorce: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) यांच्या घटस्फोटाला दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) मंगळवारी मंजुरी दिली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हनी सिंगने शालिनीला एक कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्टही दिला होता. घटस्फोटाच्या सुनावणीत हनी सिंगसोबत मेट लॉ ऑफिसचे भागीदार ईशान मुखर्जी, वकील अमृता चॅटर्जी आणि जसपाल सिंग होते.

अडीच वर्षांनी घटस्फोट मंजूर झाला
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक न्यायालयात परमजीत सिंह यांनी हनी सिंग आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरू असलेले अडीच वर्ष जुने प्रकरण संपुष्टात आणले आणि दोन्ही पक्षांना घटस्फोटाचा आदेश दिला. हनीच्या पत्नीने सिंह यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
हनी सिंग आणि शालिनी लग्नापूर्वी जवळपास 20 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2011 मध्ये या जोडप्याने दिल्लीतील गुरुद्वारामध्ये शीख रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात लग्न केले. दोघांचे लग्न अगदी गुपचूप होते. ज्यामध्ये फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेतला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. यानंतर हनी सिंगने एका रिअॅलिटी शोमध्ये शालिनीसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता.

हनी सिंग हे संगीत जगतातील एक मोठे नाव आहे. ज्याने अनेक हिट अल्बम तर केलेच पण हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट गाणी दिली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’