Uma Bharti Returns: उमा भारतीची मध्य प्रदेश निवडणुकीत एन्ट्री होणार, हिमालयात जाण्याचा प्लॅन रद्द

Uma Bharti Returns: माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही मध्य प्रदेश निवडणुकीत (Madhya Pradesh Election) भाजपचा प्रचार करण्याचे ठरवले आहे. त्यांनी तर केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर हल्लाबोल करून दौऱ्याची सुरुवात केली आहे. यासोबतच उमा भारती यांनी हिमालयात जाण्याचा कार्यक्रम रद्द केला असून मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या मोसमात प्रचारासाठी सज्ज झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार 9 नोव्हेंबरपासून त्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. उमा भारती यांचा निवडणूक प्रचार सांची येथून सुरू होणार आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा तीर्थ दर्शन योजनेवरील दावाही त्यांनी चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

याआधी उमा भारती यांनी प्रचाराला नकार देत हिमालयात जाण्याची घोषणा केली होती. भाजपच्या स्टार प्रचारक यादीत त्यांचे नाव नव्हते. याबाबत उमा भारती यांनीही नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आपल्याला प्रचारासाठी जिथे बोलावतील तिथे आपण जाईन, असे उमा भारती म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’