मोमोज प्रेमींसाठी भन्नाट उपाय! असे बनवा मोमोजला आरोग्यदायी, चवीलाही असतील लाजवाब

Healthy Momos: स्ट्रीट फूड सर्वांनाच आवडते, त्यात चायनीज बहुतेक लोकांचे आवडते आहे. चायनीज फूडमधील मोमोज हे सर्वांचे आवडते आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मोमो तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक असू शकतात. सर्वप्रथम मोमोज मैद्यापासून बनवले जातात, त्यामुळे ते पोटासाठी हानिकारक आहे, याशिवाय मोमोज लाल चटणीसोबत खाल्ले जातात. ही चटणी लाल तिखट आणि मसाल्यापासून बनवली जाते, जी शरीराला हानी पोहोचवते. मैद्यापासून बनवलेले मोमो स्वादुपिंडासाठी धोकादायक असतात. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढतो. पण जर तुम्ही मोमोज प्रेमी असाल तर काळजी करण्याची गरज नाही. आपण ते आरोग्यदायी देखील बनवू शकता.

असे बनवा हेल्दी मोमोज

  • मोमोज बनवण्यासाठी मैदा पिठाचा वापर केला जातो, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. मैद्याऐवजी, तुम्ही गव्हाचे पीठ वापरू शकता, जे मोमोजला अधिक आरोग्यदायी बनवेल.
  • मोमोज हेल्दी बनवण्यासाठी हंगामी भाज्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे चवीबरोबरच आरोग्यही वाढेल.
  • ममोज तयार करण्यासाठी अंकुरलेले मूग देखील वापरता येऊ शकतात. चांगले शिजवलेले अंकुरलेले मूग त्याच्या फिलिंगमध्ये भरले जाऊ शकते, ज्यामुळे ते खूप आरोग्यदायी बनू शकते.
  • मोमोजमध्ये पनीर भरून तुम्ही टेस्ट दुप्पट करू शकता. तुमच्या चवीनुसार बदल करूनही तुम्ही चविष्ट मोमोज तयार करू शकता.
  • मांसाहार प्रेमी मोमोजमध्ये किसलेले मांस भरून स्वादिष्ट मोमोज घरी बनवू शकतात.
  • तुम्ही हंगामी भाज्या किंवा चिकन मटनाचा रस्सा घालून मोमोज कव्हर देखील बनवू शकता. यामुळे त्याची टेस्ट तर वाढेलच, पण ती आरोग्यासाठी पोषकही ठरेल.
  • मोमोज भरण्यासाठी तुम्ही कॉर्न देखील वापरू शकता. कॉर्न आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॉर्न मोमोजही खायला खूप चविष्ट असतात.
  • मशरूम अनेकांना आवडत नाहीत, पण मशरूम भरल्याने मोमोजची चव वाढते. मशरूम नीट तळून घेतल्यावर तुम्ही ते मोमोजमध्ये भरून खाऊ शकता.