LokSabha Election 2024 | मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या ठाण्यात उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?

लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे.

बहुचर्चित असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या शिंदेच्या शिवसेनेतील उमेदवाराची घोषणा धुळवडीला होणार आहे. मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या ठाण्यात उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

या लोकसभेच्या जागेसाठी (LokSabha Election 2024) आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावं चर्चेत आहेत. विद्यमान खासदार राजन विचारे हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात एकनाथ शिंदे आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

 ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात