‘मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही, अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठन ( Hanuman Chalisa reading ) करण्याचा हट्ट धरणाऱ्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती रवी राणा ( Ravi Rana )  यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता आपण मागासवर्गीय ( Backward class ) असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला ( Lok Sabha Speaker Omprakash Birla ) यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हा आरोप केला आहे.

खासदार नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की,पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ( Khar Police Station ) ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही ( No water was given overnight ) . मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

“मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान, रविवारी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात आहे आणि माझ्याबदल खालच्या दर्जात बोललं जात आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.