माझे शब्द लिहून ठेवा, ऊसामुळे एकदिवस आत्महत्येची वेळ येईल : गडकरी

सोलापूर : वाढत्या ऊस उत्पादनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी चिंता व्यक्त करताना शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला. पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात विशेषत: सोलापूर जिल्ह्यात ( In Solapur district ) एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं गाळप ( Sugarcane flour ) होत आहे. पण ऊसाचं क्षेत्र दिवसेंदिवस असंच वाढत राहिलं, लोकही ऊसाच्याच पाठीमागे लागले, तर एकदिवस आत्महत्या ( Suicide ) करण्याची वेळ येईल, माझा शब्द लिहून ठेवा, असा इशाराच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

गडकरी यांनी म्हटलं आहे की, साखर सरपल्स झाली आहे. काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ ( Brazilian delegation ) आले होते. त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून बबनराव आज तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण जर ब्राझीलमध्ये साखर वाढली तर 22 रुपये साखरेचा भाव होईल. तुम्हाला उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत, तुम्हाला राजकारण करायचे आहे. त्यामुळे काय करायचे बघा. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती ( Ethanol production from sugarcane syrup ) करा, मला आनंद आहे की आपल्याकडे इथेनॉल निर्मिती होते. इथून पेट्रोल हद्दपार करा, असं ते म्हणाले.

गडकरी म्हणाले की, साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा. कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे. आपण साखर उत्पादनमध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले.