Uddhav Thackeray | मी सुद्धा भाजप फोडू शकलो असतो, पण…; उद्धव ठाकरेंनी केला भला मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हे तर महाविकास आघाडीलादेखील धक्का मानला जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर विविध प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या मुद्द्यावर भाष्य करत भाजपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, मागच्या वेळी लोकसभेत जे झालं ते आता होऊ द्यायचं नाही. अशोक चव्हाणा एवढ्या लवकर भाजपमध्ये जातील, असं वाटलं नव्हतं. तुम्ही तिकडे गेलात म्हणून आज टीका करणार नाही, पण याची किंमत अनेक पिढ्यांना मोजावी लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

‘सत्तेसाठी साठमारी सुरू आहे, तुमच्याकडे कोण लक्ष देणार? मी तुमच्यासाठी मैदानात आलोय. मी सुद्धा भाजप फोडू शकलो असतो, पण मला त्या नालायकांची गरज नव्हती’, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया