कॉंग्रेस नेत्यांची पळापळ झाली सुरु; डॅमेज कंट्रोल करण्याकरीता बैठकांचे सत्र

Congress Damage control Meeting: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हे तर महाविकास आघाडीलादेखील धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळेपक्षाची गळती थांबविण्याचे मोठे आव्हान आता कॉंग्रेस समोर असणार आहे.

आधी मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांसारेख पक्षातील दिग्गज नेते एकामागोमाग पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची हायकमांडसोबत चर्चाही झाली. डॅमेज कंट्रोल करण्याकरीता कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे आमदारांशी संपर्क साधत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर आता आजही काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही बैठक बोलावली आहे. चेन्निथला हे आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे ज्येष्ठ नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहतील. आज दुपारी १ वजात ही बैठक पार पडेल.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया