“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

Ashok Chavan : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असताना आता आणखी एक मोठी बातमी येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली.

राहुल नार्वेकरांशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही.” असे अशोक चव्हाण टीव्ही मीडियाला म्हणाले.

शिवाय पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया