“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

Ashok Chavan : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असताना आता आणखी एक मोठी बातमी येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू”, असे नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया