Vijay Shivtare | मी अपक्ष म्हणून लोकसभा लढवणार; शिंदे गटाच्या विजय शिवतारेंच्या घोषणेमुळे बारामतीत तिरंगी लढत होणार

Vijay Shivtare | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून बारामती लोकसभा मतदारसंघावर सर्वांचे लक्ष असणार आहे. येथे पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळू शकते. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना चॅलेंज दिले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरोधात वक्तव्य करताना मोठी घोषणा केली आहे. बारामतीतून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला. यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

‘बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं’ असा निर्धार व्यक्त करत शिवतारे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य