Amol Mitkari | विजय शिवतारेंना आवरा अन्यथा…; मिटकरींचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा  

Amol Mitkari: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यामध्ये थेट सामना होईल अशी शक्यता असताना दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

यातच सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा (Ajit Pawar) बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दरम्यान, आता विजय शिवतारे (Vijay SHivtare) यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. एकनाथ शिंदे साहेब शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केलाय. महायुती सोबत राहुन जर दादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा करित असतील तर आमचाही नाईलाज होईल..असे मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य