Vijay Shivtare | “अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली”, विजय शिवतारेंनी 5 वर्षांची भडास एका दमात काढली

Vijay Shivtare vs Ajit Pawar | बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं, असा निर्धार व्यक्त करत माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज सासवडमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच यावेळी अजित पवार यांच्यावर हल्लाही चढवला.

पाच वर्षापूर्वीचा किस्सा सांगताना विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. मी वैयक्तिक नव्हतो. परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावतीमध्ये अॅडमिट होतो. मला बायपास करायला सांगितली. स्टेन टाकल्या फेल झाले आणि मी संपूर्ण कार्डिअॅक अॅम्ब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला. अजित पवारांनी पालखी तळावर सांगितलं, मरायला लागलाय तर कशाला निवडणूक लढवताय. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी अॅम्ब्युलन्समधून प्रचार केला. तुम्ही खोटं बोलत आहात, लोकांची साथ घेण्यासाठी हे खोटं चाललेले काम तुमचं आहे. माझ्या गाडीपर्यंत पोहोचले, कुणाची आहे, नंबर काढला इतक्या खालच्या थरावर अजित पवार आले.

ते म्हणाले की, तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, पाडतोच. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव प्रवृत्ती असावी. गाव बसवायला अनेक लोक लागतात, गाव पेटवायला नालायक माणूस लागतो. त्यांना मी माफ केले होते, महायुती झाल्यानंतर. पण गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाहीत असे लोकांनी सांगितले. पवारांच्या विरोधातली मते आहेत. लोकांचा घात होतोय असं कळले. लोक म्हणायला लागले, सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत. पण अजित पवार उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करु असे लोक म्हणायला लागले. लोक म्हणाले, एका बाजूला एक लांडगा आहे आणि एक वाघ आहे तर कुठेतरी जावंच लागेल. त्यापेक्षा सुप्रिया सुळेंना देऊ अशी लोकांची भावना आहे. बारामतीत 6, 80,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे, पण 5 लाख 80 हजार मतदान हे विरोधात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य