४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू – राऊत 

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला असून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे.

दरम्यान,ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असं दिसला. तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

मी हे संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले आहे.