ICC ने सूर्यकुमार यादवला केले कर्णधार, 4 भारतीय खेळाडूंना टी20 संघात मिळाले स्थान

ICC T20 Team of The Year: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्तम संघ निवडला. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आयसीसीने या संघाचा कर्णधार बनवले होते. या संघात सूर्यासह चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. भारताशिवाय झिम्बाब्वेच्या दोन खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. तसेच, आयर्लंड, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि युगांडाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

3 मोठ्या देशांचे खेळाडू गायब
विशेष म्हणजे पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला या संघात स्थान मिळालेले नाही. या स्पेशल प्लेइंग 11 मध्ये ज्या भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे त्यात सूर्यकुमार यादवसह दोन फलंदाजांचा समावेश आहे. आयसीसीने एका फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजाचाही संघात समावेश केला आहे. या वर्षी टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. हे चार खेळाडू भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

कोण आहेत ते 11 खेळाडू?
यशस्वी जैस्वाल (भारत), फिल सॉल्ट (इंग्लंड), निकोलस पूरन (डब्ल्यूके, वेस्ट इंडिज), सूर्यकुमार यादव (कर्णधार, भारत), मार्क चॅपमन (न्यूझीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), अल्पेश रमाझानी (युगांडा), मार्क अडायर (आयर्लंड), रवी बिश्नोई (भारत), रिचर्ड नगारावा (झिम्बाब्वे), अर्शदीप सिंग (भारत).

सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचे नेतृत्व केले
सूर्यकुमार यादवला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अलीकडेच तो पहिल्यांदाच भारताचा कर्णधार होताना दिसला. एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघाची कमान सांभाळली. गेल्या दीड वर्षांपासून तो सातत्याने नंबर 1 टी-20 फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने टी-20 संघाचे कर्णधारपदही सांभाळले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये परतला आणि संघाचा कर्णधारही होता. आता पाहावे लागेल की, हार्दिक आणि सूर्या विश्वचषकात तंदुरुस्त झाल्यावर टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार?

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी