भाई जगताप यांचा पराभव करून जुने हिशेब चुकते करण्याची प्रसाद लाड यांना संधी

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था (Local self-government bodies) मतदारसंघात २०१६ मध्ये दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap) आणि भाजप पुरस्कृत प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्या लढतीत जगताप यांनी लाड यांना पराभूत केले होते. या वेळी दहाव्या जागेसाठी जगताप आणि लाड यांच्यात लढत होत असून, गेल्या निकालाची पुनरावृत्ती होते की लाड जुने हिशेब चुकते करतात, याची उत्सुकता असेल.

या निवडणुकीत जर लाड यांचा पराभव झाला तर तो एका अर्थाने फडणवीस (Fadanvis) यांच्या जिव्हारी लागणाराच असेल. शरद पवार9Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिग्गज नेते लाड यांच्याबाबत प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र, राष्ट्रवादीतील अनेक मंत्र्यांशी सुमधूर संबंध असल्यामुळे प्रसाद लाड या निवडणुकीत राजकीय चमत्कार करुन दाखवणार का, हे आता पाहावे लागेल.