मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्या सारखा असावा – सुप्रिया सुळे

मुंबई  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.  यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाआहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला.

या सर्वांनी आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला असून रोज काही आमदार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दुसऱ्या बाजूला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यातील खरेपणा मनाला भावतो. राजकारणात चढ-उतार येत असतात. पण शेवटी माणसं आणि नाती महत्वाची असतात. या नात्यांचा ओलावाच आयुष्यात टिकतो. मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्या सारखा असावा असं सुळे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज ज्या भावना दाखवल्या आहेत त्या खूप मोठ्या मनाच्या माणसाच्या आहेत. आज मला माँ आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांची आठवण येत आहे. त्या दोघांमधील संवेदनशीलता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसत आहे. बाळासाहेबांनी सर्वांनाच प्रेम दिलं. त्यात माझा देखील समावेश आहे. मला सुद्धा अगदी लहान पणापासून त्यांनी प्रेम दिलं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.