‘आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले, ‘ते’ आजही डेसिबल मोजताहेत’

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत. पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडलेत. त्याचा आवाज आजही घुमतो. विरोधक म्हणणार नाही. पण आमचे जे काय हितचिंतक आहेत ते त्या फटाक्याच्या आवाजाचा डेसिबल आजही मोजत आहेत. मोजू देत. आम्ही बेधडक कार्यक्रम केला, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यावरून त्यांनी कोटी केली. टीम इंडियाने मॅच जिंकली. काल जशी टीम इंडियाने मॅच जिंकली तशीच मॅच आम्ही तीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलो. ही मॅच फक्त महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने पाहिली, अशी टोलेबाजी शिंदे यांनी केली होती. शिंदे यांच्या या फटकेबाजीला ठाणेकरांनी हसून मनमुराद दाद दिली होती.