किरीट सोमय्यांची केवळ नौटंकी, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवावं – परब 

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दोपोलीतील रिसॉर्टवरुन सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांचा थयथयाट आज पाहायला मिळाला. ते म्हणाले, सोमय्या  वातावरण खराब करत आहेत. सोमय्या यांच्यामुळे जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे, असेही परबांनी सांगितले आहे.या बाबत मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे. कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम ते करत आहेत. म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, असा इशाराही परबांनी दिला आहे.

किरीट सोमय्या रिसॉर्ट तोडायला कर्मचारी आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. हिंमत असेल तर तोडून दाखवा, असे खुले आव्हान त्यानी सोमय्यांना दिले आहे. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भंग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. असंदेखील ते म्हणाले.