‘परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊ द्या, त्याचा काही उपयोग होणार नाही’

मुंबई – 100 कोटी वसुली प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh)  यांची उलट चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आणि आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान,  आता शिवसेना खासदास संजय राऊत यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. परमबीर सिंहावर खंडणीपासून अपहरणापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊ द्या. त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो. याबरोबरच विरोधी पक्षांनी याचं कितीही भांडवल केलं तरी त्याचाही काही उपयोग होणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.