वाझेच्या पुर्ननियुक्तीसाठी ‘या’ नेत्याचा होता माझ्यावर दबाव; परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट

मुंबई – सचिन वाझे आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अडचणीत येणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाव ईडीला दिला आहे.

इडीला दिलेल्या जबाबात सिंग यांनी म्हटले आहे की, माझ्यावर सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमवीर सिंह यांनी ईडीला दिला आहे.

याशिवाय पुढे या जबाबात परिवहनमंत्री अनिल परब यांचे देखील नाव घेण्यात आले असून विशेष म्हणजे बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले. या सर्व प्रकारात आता राज्य सरकार कसा स्वतःचा बचाव करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.