गळ्यात माळ, कपाळावर टिळक, दिग्दर्शकासोबतचा व्हायरल लग्नाचा फोटो पाहून साई पल्लवीला राग आला, म्हणाली…

Sai Pallavi Reacts On Fake Wedding Pic: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) सुप्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक सई पल्लवी (Sai Pallavi) आहे. तिने इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. अलीकडेच, साउथ सिनेमातील अभिनेत्री साई पल्लवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये साई पल्लवी दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांच्यासोबत दिसत आहे आणि दोघांनीही गळ्यात हार घातले होते.

या फोटोबाबत सईने राजकुमार पेरियासामीसोबत गुपचूप लग्न केल्याचे (Sai Pallavi Fake Photo) बोलले जात होते. मात्र, ही बातमी खोटी असल्याचे आता स्पष्ट झाले. म्हणजेच सई आणि राजकुमार पेरियासामीसोबत लग्न झालेले नाही, हे फोटोज एस पल्लवीच्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्त समारंभाचे होते. राजकुमारने 9 मे 2023 रोजी साई पल्लवीच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो ट्विट केला होता.

काही यूजर्सने हा फोटो क्रॉप केला आणि तो अशा प्रकारे शेअर करायला सुरुवात केली की जणू राजकुमार आणि सई पल्लवीचे लग्न झाले आहे. आत्तापर्यंत गप्प बसलेल्या सई पल्लवीनेही व्हायरल होणाऱ्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये असे दिसून येते की ती या अफवांमुळे खूप निराश असल्याचं म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’