काहीतरी नवं अन् चविष्ट खा! कुरकुरीत खेकडा कांदा भजी कशी बनवायची? वाचा संपूर्ण रेसिपी

दररोजच्या जेवणात चपाती, भाजी, भातचा समावेश असतो. परंतु कधी-कधी या जेवणारा चटपटीत आणि लज्जतदार बनवण्यासाठी भजी बनवली जातात. कांदा भजी, बटाटा भजी, पालक पकोडे अशी नानाविध प्रकारची भजी घरी बनवली जातात. कोकणात खेकडा भजी फार प्रसिद्ध आहेत. तुम्ही कोकणात गेल्यानंतर कुरकुरीत खेकडा भजी आणि चहाचा आस्वाद नाही घेतला, तर काही मज्जा नाही. विशेष म्हणजे, ही भजी एकदम झटपट बनतात. तर चला आपण पाहू झटपट होणारी खेकडा कांदा भजीची रेसिपी (Khekda Bhaji Recipe)…

खेकडा कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
४ कांदे
१ वाटी बेसन
१/२ वाटी तांदळाचे पीठ
चिमूटभर हिंग
१.५ टेबलस्पून मालवणी मसाला
१/२चमचा हळद
चिमूटभर धणे जीरे पावडर
चवीनुसार मीठ
१५० मि.ली पाणी
४ टेबलस्पून तेल

खेकडा कांदा भजीची रेसिपी- 
सर्वप्रथम कांदा उभा आणि बारीक चिरून घ्या. कापलेल्या कांद्यात अर्धा चमचा मीठ घाला आणि कांदा १५-२० मिनिट बाजूला ठेवा. कांद्यावर मीठ टाकून ठेवल्याने त्याला पाणी सुटते आणि मग त्यावर बेसन पीठ जास्त बसत नाही.

आता भजी बनवण्यासाठी पीठ कसे बनवायचे हे पाहू. १ वाटी बेसन पीठ घ्या. त्यात अर्धा वाटी तांदळाचे पीठ टाका. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, ओवा चिमूटभर, खाण्याचा सोडा चिमूटभर, हिंग, धणे जीरे पावडर टाकून मिश्रण हलवून घ्या. मग हे मिश्रण कांद्यात टाका व हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण हलवून घ्या. मिश्रण जास्त पातळ बनवू नका. मग हे मिश्रण घेऊन भजी बनवा व ती तेलात तळून घ्या. ही भजी तुम्ही चटणी, सॉससोबत सर्व्ह करू शकता.