भाजप वाल्यांना जर बाळासाहेबांबद्दल आदर असता तर आमचे युती संदर्भातील शब्द फिरवला नसता – ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज भाजपला ( BJP ) चांगलेच झोडपले आहे. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपवाले म्हणतात की आम्हाला बाळासाहेबांचा आदर आहे. मग मी त्यांना प्रश्न करतो की त्यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेंबांचे नाव देण्यासाठी विरोध का केला असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur north election) आज उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून सभेला संबोधित केलं. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप वाल्यांना जर खरचच बाळासाहेबांबद्दल आदर असता तर आमचे युती संदर्भात जे काही बोलणे झाले होते, त्यावरून त्यांनी शब्द फिरवला नसता. कारण ही सर्व बोलणी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये झाली होती, त्या खोलीला आम्ही मंदिर मानतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिडकारलं. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदूहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा. असं ते म्हणाले.