कोरोनाची लाट येते मग भगव्याची लाट का नाही येणार, उद्धव ठाकरेंनी फोडली डरकाळी

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. त्यात मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष देसाई यांनी केले.

यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय असे आदेश दिले आहेत. तर, कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत मग आपल्याकडे भगव्याची लाट का येऊ शकत नाही ? असा सवाल त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे.

दरम्यान, या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. ‘काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार एकटं लढण्याचं आव्हान द्यायचं आणि मग ईडी मागे लावायची हे असले धंदे विदरोधकांचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर, काळजीवाहू विरोधक काळजी करुनच संपणार असा चिमटा देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.