‘या’ विदेशी फळाची शेती करुन शेतकरी ६ महिन्यांत लाखो कमावू शकतात, जाणून घ्या सविस्तर

अल्पावधीतच चांगला नफा मिळत असल्याने विदेशी फळांच्या लागवडीचा कल भारतात वाढू लागला आहे. स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूटची लागवड करून शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळवण्यास सुरुवात केली आहे. अशा विदेशी फळांमध्ये थाई  ऍप्पल बेरचा (Thai Apple) समावेश आहे. हे फळ सफरचंदासारखे दिसते आणि त्याची चव मनुका सारखी लागते. यासोबतच या फळामध्ये रोगप्रतिकारक शक्तीही जास्त असते.

अशी शेती करतात
थाई  ऍप्पल बेरला (Thai Apple Ber) बाजारात मोठी मागणी आहे. सुरुवातीच्या 50 ते 60 हजारांच्या खर्चात शेतकरी 100 किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतात. या रोपाची लागवड करण्यासाठी शेताची नांगरणी करून प्रत्येक रोपासाठी 5 मीटर अंतरावर 2-2 फूट लांबी-रुंदीचे चौकोनी खड्डे खोदले जातात. या खड्ड्यांमध्ये 25 दिवस सौरीकरण केले जाते, त्यानंतर 20 ते 25 किलो चांगले कुजलेले किंवा कंपोस्ट खत, कडुलिंबाची पाने, कडुलिंबाची पेंड आणि काही पोषक घटक मिसळून खड्ड्यात भरले जातात.

थाई ऍप्पल बेरची लागवड कटिंग पद्धतीने केली जाते. शेतकरी थाई ऍप्पल बेरची 80 रोपे 1 बिघा शेतात 15 फूट अंतरावर लावू शकतात. याशिवाय मोकळ्या जागेत वांगी, मिरची, वाटाणा, मूग या पिकांची लागवड करून शेतकरी जादा कमाई करू शकतात. या प्रजातींच्या झाडांमध्ये दुष्काळ सहन करण्याची ताकद असते.

शेतीसाठी चांगला पर्याय
थाई ऍप्पल बेरची लागवड करण्यासाठी देशी आणि संकरित प्रजाती वापरल्या जातात. या दोन्ही प्रजातींपासून शेतकरी 6 महिन्यांत 100 किलोपर्यंत फळे घेऊ शकतात. लागवडीनंतर एक वर्षानंतर, जेव्हा झाड परिपक्व होते, तेव्हा 20 ते 25 किलो फळे येऊ लागतात. एकदा लागवड केल्यावर पुढच्या 50 वर्षांसाठी थाई ऍपल बेर पिकाचे बंपर उत्पादन घेऊन शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.