जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता – पडळकर

Gopichand Padalkar Criticize Rohit Pawar: नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवार हे जातीयवादी असल्याची टीका पडळकरांनी केली.

या मेळाव्यात बोलतांना ते म्हणाले, रोहित पवार नावाचं जातीयवादी नेतृत्व या जिल्ह्यात आहे. हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का नाही? रोहित पवारांच्या अंगात रक्त नाही तर जातीयवाद वाहतो. जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता, अशी टीका त्यांनी केली.

राजसत्ता आणि राजपाद मागून मिळत नाही, तो हिसकाऊनच घ्यायची असते. जर आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असेल तर ओबीसींना एकत्र येण्याची गरज आहे. ओबीसींचा आवाज दाबू शकत नाही. आता ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस