पुण्यातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : चंद्रकांत पाटील

पुणे – पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी पुण्यातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकसाठी कालबद्ध नियोजन करणार असल्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात चंद्रकांतदादांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके, महिला उत्सव प्रमुख माजी शिक्षण मंडल अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके, सौ.अक्षदा भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर,प्रसिद्ध उद्योगपती संजीव अरोरा,ग्लोबल ग्रुप चे मनोज हिंगोरानी,मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, आरपीआय चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार जोशी, युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर, मोहित भेलके व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी कोरोना नंतर मुक्त वातावरणात साजऱ्या होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा देताना “आमच्या सरकारने निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केली असली तरी स्वयंशिस्त महत्वाची असून दुसऱ्यांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने उत्सव साजरे करावेत असे सांगितलं. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासात असून दुर्गम भागातील विद्यार्थिनींना स्वेटर वाटप, दिव्यांगाना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, गरजू विद्यार्थिनींची फी भरणे अश्या विविध उपक्रमांनी ते खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी करत असल्याचे ही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. मी कोरोना काळात क्रिएटिव्ह फाउंडेशन ने केलेले समाजकार्य जवळून बघितले असून असेच समजसेवेचे व्रत घेऊन सर्वांनी कार्य करावे असेही ते म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समाजकार्यासाठी सातत्याने मदत करणारे उद्योगपती संजीव अरोरा,ग्लोबल ग्रुप चे मनोज हिंगोरानी, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया यांचा तसेच लावणी कलावंत योगेश देशमुख, पूनम कुडाळकर, माधवी सातपुते तसेच सत्यजित धांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

पावसाचा फटका पुणे शहराला बसला असताना आणि ऐन कार्यक्रमाच्या वेळी धुव्वाधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिले ही क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या कार्याची पावती असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.नाटक आणि लावणी च्या कार्यक्रमाला प्रेक्षागृहाला हाऊसफुल चा बोर्ड लागणे दुर्मिळ असून आता भोंडला, मंगळागौरीचे खेळ, बालजत्रा व दांडियाच्या कार्यक्रमालाही कोथरूडकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला. मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांच्या हस्ते दिव्यांगांनी बनविलेल्या वस्तू देऊन चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले, विशाल भेलके यांनी स्वागत तर उमेश भेलके यांनी आभार प्रदर्शन केले.