हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणुका घेऊ दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला (Chief Minister Eknath Shinde and BJP) दिले. शिवसेना भवनात जिल्हा प्रमुख यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.