Abhishek Ghosalkar Firing | अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

Abhishek Ghosalkar Firing : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर काल मुंबईतील दहिसर इथं गोळ्या झाडण्यात आल्या; त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मॉरिस नोरोन्हो (Morris Noronho) याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक आणि मॉरिस फेसबुकवर लाईव्ह असताना ही घटना घडली. त्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. दरम्यान, या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात (Abhishek Ghosalkar Firing) पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. आरोपी मॉरिस नोरोन्हाचा पीए मेहुल पारीख आणि दुसरा रोहित साहू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एम एच बी पोलिसांनी त्यांच्याकडून 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.गोळीबार करणारा आरोपी मॉरिश याचा PA मेहुल पारीखला एम एच बी पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ