पुण्यातील मराठी उद्योजकाचा अयोध्येत डंका, मल्टीलेवल पार्किंगसह फूडकोर्ट; रूफटॉप रेस्टॉरंट चालवण्याचे मिळाले काम

Pune:- पुण्यातील मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्विसेस या कंपनीला अयोध्येतील पहिले चार मजली मल्टीलेवल पार्किंग चालवण्याचे काम मिळाले आहे. तसंच येथील फूडकोर्ट आणि रूफटॉप रेस्टॉरंटही चालवण्याचे काम मिळाले आहे. पुढील १५ वर्षांसाठी या कामाचा कालावधी आहे.देशातील अनेक कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. परंतु स्मार्ट सर्विसेसला ही निविदा पदरात पाडून घेण्यात यश मिळाले.

शिवाजी मानकर

अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) पूर्ण झाल्याने येत्या काळात रामभक्तांची मोठी गर्दी इथं होणाराय.त्यामुळं अयोध्या नगर निगमने इथल्या रेल्वे स्टेशनसमोर चार मजली मल्टीलेवल पार्किंग उभे केलंय. चारचाकी गाड्या ५०० तर १ हजार दुचाकींची पार्किंग क्षमता आहे. या पार्किंग इमारतीवर रूफटॉप रेस्टॉरंट असेल. तसंच बाजूला सुमारे ५० हजार चौरस फूटांची मोकळी जागा असून याठिकाणी २८ फूडकोर्टचे बांधकाम सुरूय. या फूडकोर्टमध्ये प्रामुख्याने मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळं मराठी लोकांना अयोध्येत मराठी खाद्यपदार्थांची चव चाखता येणाराय. संबंधित मल्टीलेवल पार्किंगमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरवल्या गेल्यात. मोबाईल एपच्या माध्यमातून गाडी पार्क करण्यासाठी कुठे जागा आहे,जितका कालावधी गाडी पार्क केली असेल तितकेच पैसे फास्टटॅगमधून घेतले जाणारेत. चंद्रकांत गायवाड यांची ही कंपनी १४ वर्षे जुनी असून महाराष्ट्रात तर त्यांची विविध कामे चालू आहेतच शिवाय राजस्थान,तेलंगणा,मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातही कामे चालू आहेत. नफा हा उद्देश न ठेवता श्रीरामाची सेवा यानिमित्ताने करायला मिळणार असल्याची प्रतिक्रिया स्मार्ट सर्विसेसचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा