Shashank Singh | आयपीएलमध्ये ज्या खेळाडूला पंजाब किंग्जने ‘चुकून’ विकत घेतले, तोच ठरला मॅच विनर; कोण आहे शशांक सिंग?

Shashank Singh | पंजाब किंग्जने (PBKS) इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 17 व्या सामन्यात शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सकडून विजय हिसकावून घेतला. आयपीएलचा हा रोमांचक सामना पंजाबने 1 चेंडू शिल्लक असताना 3 गडी राखून जिंकला. मात्र, पंजाबच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला 32 वर्षीय शशांक सिंग. शशांकने 29 चेंडूत 61 धावांची दमदार खेळी करत सामन्याच कौल बदलून टाकला. शशांकने प्रभावशाली खेळाडू आशुतोष शर्मासोबत 43 धावांची शानदार भागीदारी केली.

4 एप्रिल रोजी गुजरात विरुद्ध पंजाबसाठी सामना विजेता ठरलेल्या शशांकबद्दल जाणून घेण्याआधी, आपल्याला थोडेसे डिसेंबर 2023 मध्ये जावे लागेल, जेव्हा आयपीएल 2024 साठी मिनी लिलाव दुबईमध्ये झाला होता. पंजाब किंग्सने अनकॅप्ड शशांक सिंगला (Shashank Singh) 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते.

पण त्यानंतर प्रीती झिंटाच्या टीमने त्याला ‘चुकून’ विकत घेतल्याचा वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर तसे काही नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, हा तोच शशांक सिंग आहे, ज्याला पंजाब किंग्ज संघाने त्यावेळी चुकीने खरेदी केल्याचा आरोप केला होता. एकंदरीत शशांकला लिलावात विकत घेऊन एकप्रकारे त्याचा अपमान झाला होता, आता त्याच शशांकने पंजाबची इज्जत वाचवली आहे.

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शशांकने 61 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. शशांकसह प्रभावशाली खेळाडू आशुतोष शर्माने शानदार फलंदाजी करत गुजरातच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. अशाप्रकारे पंजाबने 4 पैकी 2 सामने जिंकून आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. 25 वर्षांचा आशुतोष देखील शशांकसारखा अनकॅप्ड खेळाडू आहे.

अशाप्रकारे शशांक सिंगने संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 199/4 धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूंत 6 चौकार आणि चार षटकारांसह 89 धावा केल्या. तर साई सुदर्शनने 19 चेंडूत 33 धावांची खेळी केली. केन विल्यमसन (26) आणि राहुल तेवतिया (नाबाद 23) यांनीही गुजरातसाठी उपयुक्त योगदान दिले. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन बळी घेतले.

यानंतर पंजाबने धावांचा पाठलाग सुरू केला तेव्हा 70 धावांपर्यंत मजल मारली तोपर्यंत पंजाबचे चार खेळाडू शिखर धवन (01), जॉनी बेअरस्टो (22), प्रभासिमरन सिंग (35), सॅम कुरन (05) बाद झाले. त्यानंतर शशांक सिंग फलंदाजीसाठी आला. 15.3 षटकांत जितेश शर्मा बाद झाल्यानंतर त्याने आणि आशुतोष शर्मा (31) यांनी शानदार भागीदारी केली. त्याच्यासोबत सामना शेवटच्या षटकांपर्यंत नेला आणि विजय मिळवून दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत