Rashmi Barve | भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण; उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंचा हल्लाबोल

Rashmi Barve | जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरल्याने उमेदवारी अर्ज बाद झालेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी भाजपाच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या बड्या नेत्यानं आपलं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी भाजपाचा दुसरा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत असल्याचा खळबळजनक आरोप रश्मी बर्वे यांनी केला आहे.

“भाजपाच्या एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी नागपुरातील भाजपाचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता. मात्र भाजपाचा तो मोठा नेता नेहमीच सत्याच्या बाजूनं राहतो आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहतो अशी त्याची प्रतिमा होती. त्यामुळे मला त्या बड्या नेत्यांपासून मोठी अपेक्षा होती. पण, माझ्या प्रकरणात माझ्यावर अन्याय होत असताना भाजपाचा तो नेता आपल्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला. त्यामुळे त्या आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या नेत्यापासून माझा भ्रमनिरास झाला.” असे रश्मी बर्वे म्हणाल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत