Preity Zinta | ‘चुकून’ विकत घेतलेल्या खेळाडूनेच मिळवून दिला विजय, संघमालकीण प्रिता झिंटाची रिऍक्शन व्हायरल

Preity Zinta | पंजाब किंग्जने गुरुवारी आयपीएल 2024 मध्ये सर्वात मोठे लक्ष्य गाठले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा एका चेंडू शिल्लक असाना तीन गडी राखून पराभव केला.

पंजाब किंग्जच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू शशांक सिंग, त्याने 29 चेंडूंत 6 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने 200 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. एकेकाळी पंजाबच्या संघाने 70 धावांत चार विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागेल असे वाटत होते.

मात्र, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी डाव पालटला. दोघांनी पंजाबला रोमहर्षक विजय मिळवून दिला. जेव्हा दर्शन नळकांडेच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शशांक सिंगने विजयी धाव घेतली तेव्हा पंजाब किंग्जची सहमालक आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) आनंदाने खुर्चीवरून उडी मारली आणि स्टँडवरून विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. प्रिती झिंटाच्या या मजेदार स्टाइलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गैरसमजामुळे पंजाबने शशांक सिंगला विकत घेतले
गेल्या वर्षी आयपीएल लिलावात शशांक सिंगला खरेदी करताना गोंधळ झाला होता. पंजाब किंग्जने चुकून शशांक सिंगला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले होते. यामुळे बरीच चर्चा झाली होती आणि आता या खेळाडूने आपल्या कामगिरीने आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले. शशांक सिंगने अवघ्या 29 चेंडूंत 6 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत