कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चिघळला

बंगरूळ – कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण झाला आहे. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. यानंतर आता काही ठिकाणी तर बजरंग दलाने विद्यार्थीनींना भगवा स्कार्फ घालण्याची विनंती केली आहे. यामुळे शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद कर्नाटकात आता सर्वदूर पसरला आहे आणि चांगलाच चिघळला आहे.

नेमका वाद काय आहे ?

जानेवारीत उडुपीतील एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली.

दरम्यान, कर्नाटक हायकोर्टात हिजाबच्या वादावर सुनावणी सुरू असताना आणि हिजाब घालण्यावरून विद्यार्थी आणि सरकार यांच्यात वाद सुरू असताना, निदर्शने आणखी तीव्र झाली आहेत. मंगळवारी कर्नाटकातील उच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी भगवी शाल आणि हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.