Telangana : KCR यांनी करून घेतलं स्वतःच हसू; जाणून घ्या नेमकं काय घडत आहे

Telangana Election Result 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच, आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.

सकाळी साडे दहा वाजेपर्यंत भाजपने मध्य प्रदेशात मोठी आघाडी घेतली आहे. राजस्थानात 199 पैकी 102 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेस 64 धावांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु सध्याच्या ट्रेंडवरून भाजप काँग्रेसपेक्षा किरकोळ पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात बहुमताचा आकडा 46 आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल यासह कामरेड्डी या मतदारसंघातूनही निवडणूक लढवित आहेत. गजवेल मतदारसंघातून जिंकण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांनी यावेळी दोन मतदारसंघ निवडले. याच मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी निवडणूक लढवित आहेत. केसीआर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असेलेल रेड्डी सध्या आघाडीवर आहेत.

महत्वाच्या बातम्या-