नविन वर्षात रिपब्लिकन पक्ष करणार उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

मुंबई – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करू लागले असून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष देखील मोर्चेबांधणी करत आहे. यातच आता नवीन वर्षाच्या प्रारंभी येत्या दि.7 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लखनौ येथे बहुजन कल्याण रॅली चे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास उत्तर प्रदेशातून हजारो लोक उपस्थित राहणार आहेत.

बहुजन कल्याण रॅलीत 1 लाखांहून अधिक लोकांच्या गर्दी होणार असून त्यातून रिपब्लिकन पक्ष उत्तर प्रदेशात आपले शक्तिप्रदर्शन घडविणार आहे.या मेळाव्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचा उत्तर प्रदेशात जनाधार वाढत आहे. त्यातून संपूर्ण उत्तर प्रदेशात बहुजन कल्याण यात्रा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आणि रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. त्या यात्रेचा समारोप आणि जाहीर सभा बहुजन कल्याण रॅली म्हणून दि.7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लखनौ मधील आवास विकास मैदान;वृंदावन योजना येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.