एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

येत्या 1 सप्टेंबरला शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवस (Eknath Khadse Birthday) आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात कार्यकर्त्यांकडून गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कायदेशीर परवानगी मागितली होती. परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणी कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.

कारण यापूर्वी गौतमी पाटीलच्या बऱ्याचशा कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला आहे. तरुणांमध्ये गौतमीची क्रेझ वाढल्यामुळे तिच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गर्दी होते. मोठ्या गर्दीमुळे हुल्लडबाज दंगा सुरू करतात. परिणामी पोलीसांना लाठीचार्ज करुन जमावाला शांत करावे लागते. दरम्यान हे समीकरण लक्षात घेत बुलढाणा येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.