शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत पक्षाविरोधात कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी रणनीती

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) शिवसेना (Shiv Sena) पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी एक तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवलं आहे. पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहेत. या बैठकीत मराठीला अभिजात दर्जा देण्याचा ठराव झालाय. तसेच 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव झालाय.