गंगाखेड उपविभागीय अभियंतांची बदली करा : ग्राम संवाद सरपंच संघटना

गंगाखेड/विनायक आंधळे : जि.प. (बा.) उपविभाग, गंगाखेड उपविभागीय अभियंता रा.र.सूर्यवंशी यांच्या आरमूठी धोरण व मनमानी कारभारामुळे गंगाखेड (Gangakhed) व पालम (Palam) तालुक्यातील विविध विकासकामे रखडली आसल्याने त्यांची बदली करण्यात यावी असे निवेदन ग्राम संवाद सरपंच संघटने (Gram Samvad Sarpanch Association) तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, परभणी (Parbhani) यांना देण्यात आले आहे. तसेच त्याची एक प्रत गंगाखेड विधानसभा आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांनाही देण्यात आली आहे.

उपविभागीय अभियंताच्या चुकिच्या कार्यपध्दतीमुळे जनता व सर्व सरपंच मंडळी अतिशय वैतागली असुन त्यांच्या जनमानसात त्यांच्या विषयी अक्रोश निर्माण होत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे. निवेदनावर ग्राम संवाद सरपंच संघटना तालुका अध्यक्ष शिवाजी पवार (Shivaji Pawar), पदाधिकारी व इतर सरपंचाच्या सह्या आहेत.