Ratnagiri Sindhudurg LokSabha | ‘शेवटच्या ४८ तासात उमेदवार जाहीर झाला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल’

Ratnagiri Sindhudurg LokSabha | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे. महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत.उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर झाला.तरी महायुतीचा च उमेदवार निवडून येईल असा विश्वास आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.विनायक राऊत यांची रिटर्न तिकीट कडूनच ठेवलेली आहे अशी टीका केली.

मोदींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे.त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतःचे थोबाड बंद केलं नाही. तर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल.स्वार्थाच दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे.अशीही टीका यावेळी केली.

राऊत आणि त्याच्या मालकाला औरंगजेब च्या बाजूला दोन कबर खोदून घेण्याची घाई लागलेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका करतील तेवढे ते त्या कबरी च्या खड्ड्यात जातील. एकीकडे मालकाच्या मुलाला वाचविण्यासाठी मालक आणि त्याच्या मालकाची बायको दिल्ली वाऱ्या करत आहेत.आणि एकीकडे पाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून भुंकायला लावून टीका करतात.राऊत ने त्याच थोबाड बंद केलं नाही. तर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल. मग रोज औरंगजेब आठवेल असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

मोदींची औरंगजेब सोबत तुलना करन म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान करणे आहेजी धार्मिक स्थळ काँग्रेसच्या काळात अंधारात होती. त्यांना उजेडात आणण्याच काम मोदी साहेबांनी केलय.सुपारीबाज राऊत ला भाजपा सोबत उद्धव ठाकरेंनी युती (Ratnagiri Sindhudurg LokSabha) करू नये. म्हणून काँग्रेस ने सुपारी दिली आहे.अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात