‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.. ओळखा पाहू कोण?’, राणेंचा मलिकांवर घणाघात

मुंबई : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाने चांगलच गाजत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचलं. म्यॉव म्यॉव असा आवाज काढत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. नितेश राणेंच्या या कृतीला आता अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मांजर मिश्रित कोंबड्याचा फोटो ट्विट करत उत्तर दिलं होत.

आता नवाब मलिक यांच्या ट्विटला नितेश राणे यांनी ट्विटनेच उत्तर दिले आहे. डुक्कराचा फोटो ट्विट करत ‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.. ओळखा पाहू कोण?’ असा घणाघात नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहात जात होते. त्यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलेल्या भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्याचवेळी नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.