आमदार राहुल कुल पत्नी कांचन कुल यांच्यासह सह बुलेटवर तिरंगा रॅलीत झाले सहभागी

दौंड –दौंड चे आमदार राहुल कुल हे पत्नी कांचन कुल यांना बुलेटवर बसवून तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले .यवत ते चौफुला असे तिरंगा रॅली चे नियोजन करण्यात आले होते.भारत माता की जय,वंदे मातरम,जय जवान जय किसान अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या .दुचाकीला तिरंगा झेंडा लावुन कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील यवत येथे आमदार ॲड. राहुल सुभाष कुल यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कांचनताई राहुल कुल यांच्या उपस्थितीत ‘भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यवत गावातील चौफुला असे रॅलीचे नियोजन करण्यात आले .

आज सकाळी 10 वाजता यवत महालक्ष्मी मंदिर येथून महालक्ष्मी मातेचे पूजन करून आमदार राहुल कुल यांनी तिरंगा झेंडा रॅलीला सुरवात केली, यावेळी त्यांनी पत्नी कांचन कुल यांना बुलेटवर मागे बसवून रॅलीला सुरवात केली .यावेळी हजारो कार्यकर्ते दुचाकी घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले .चौफुला येथे श्री कृष्ण मंगल कार्यालयात रॅलीचे सांगता सभा झाली.