पुणे- पावसाळा आला की सोबत आजार देखील घेऊन येतो. पावसाळ्यामुळे हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचा मानवाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप चालू असल्यामुळे शहरांमध्ये थंडी, ताप, सर्दी, अंगदुखी अशा संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे सोबतच डासांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या डेंगूच्या रुग्णांच्या संख्या देखील वाढत आहेत.
वातावरणात होणारे परिवर्तन हे व्हायरल इन्फेक्शनचे मुख्य कारण आहे.(The main cause of viral infection) जर आपण व्हायरल फिव्हरबद्दल बोललो तर तो आपली रोगप्रतिकारक शक्ती खराब करतो, ज्यामुळे संसर्ग खूप वेगाने वाढतो आणि एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये पसरतो, परंतु या तापाचा परिणाम फार कमी वेळेसाठी होतो. आणि त्याचा प्रभाव कमी होण्यास बराच वेळ लागतो, हे विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतात . ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यांना लगेच व्हायरल इन्फेकशन होतात.
पुण्यात गेले काही दिवस पाऊस सुरूच आहे. सोबतच श्रावण सुरु असल्यामुळे अनेक पारंपरिक उत्सव आणि सणवार सुद्धा साजरे केले जात आहेत. रक्षाबंधन, मंगळागौर, जन्माष्टमी, दहीहंडी आता गणेश उत्सवाच्या तयारीला देखील सुरुवात झालीच आहे. सणवार आले म्हणजे खरेदी आणि त्यामुळे त्यासोबतच गर्दी आणि गर्दीमध्ये अनेक जणांच्या संपर्कात आपण येतो आणि इथेच संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते. तसेच नागरिकांचे आता वर्क फॉर्म ऑफिस देखील सुरु झाले आहे त्यामुळे अनेक कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण दररोज कितीतरी लोकांच्या नकळत संपर्कात येत असतो, या कारणास्तव व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे.
व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) मुळे ताप,सर्दी,खोकला,या आजारांचा समावेश होतो. तसेच घाम येणे,थंडी वाजू अंग थरथरणे, डोके दुखी, अंगदुखी,उलट्या, भूक न लागणे, चक्कर येणे चीड चीड होणे,निर्जलीकरण ,पाय दुखणे हि लक्षणे व्यक्ती मध्ये आढळतात. (Viral infection symptoms) याच्यावर त्वरित उचार करणे गरजेचे असते.