IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला, जडेजा-आश्विनची जबरदस्त गोलदांजी

 IND vs AUS 1st Test  : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय योग्य ठरला नाही. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 63.5 षटकांत 177 धावांत आटोपला.

भारताकडून रवींद्र जडेजाने 47 धावांत 5 आणि रविचंद्रन अश्विनने 42 धावांत 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने 49, स्टीव्ह स्मिथने 37, पीटर हँड्सकॉम्बने 31 आणि यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाने 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

यष्टिरक्षक श्रीकर भरत आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताकडून पदार्पण केले. त्यामुळे शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. कुलदीप यादवच्या जागी अक्षर पटेलची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली.