Abhishek Ghosalkar firing | गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, घोसाळकर गोळीबार प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar firing) यांच्यावर काल मुंबईतील दहिसर इथं गोळ्या झाडण्यात आल्या; त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मॉरिस नोरोन्हो (Morris Noronho) याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक आणि मॉरिस फेसबुकवर लाईव्ह असताना ही घटना घडली. त्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, अभिषेक घोसाळकरवर झालेल्या गोळीबारानंतर विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत आहेत. मात्र आता फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार (Abhishek Ghosalkar firing) झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीर आहे. ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र होते. पण त्यांचा नेमका काय वाद झाला आणि असे कृत्य का घडलं? याची पोलीस चौकशी करत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात पोलीस चौकशी करत आहेत. या हल्ल्यामागे वेगवेगळी कारणे आहे. पण काही लोक राजकारण करत आहेत. या घटनेचे राजकारण योग्य नाही. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था बीघडली हे म्हणणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आले आहे. माझ्यावर पूर्णपणे राजकीय आरोप आहेत.एखाद्या गाडी खाली एकदा श्वान आला तर ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असा टोला विरोधकरांना फडणवीसांनी लगावला. विरोधीपक्षाचे काम विरोधीपक्ष करतोय. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असा सल्लाही यावेळी फडणवीसांनी दिला.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ