सरफराज खानने पदार्पणाच्या सामन्यातच रचला विक्रमांचा ढीग, हार्दिक पांड्याची केली बरोबरी

Ind vs Eng : राजकोट (Rajkot) आणि 15 फेब्रुवारीची तारीख, सरफराज खान ला (Sarfaraz Khan) आयुष्यभर आठवण राहील. या दिवशी त्याने इंग्लंडविरुद्ध भारतासाठी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि वास्तविक बजबॉल क्रिकेट खेळताना वादळी अर्धशतकही केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सरफराज खानला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात आले.

राजकोट कसोटी (Ind vs Eng) सामन्यात पदार्पण करण्यासाठी आलेल्या सरफराज खानने 48 चेंडूत 50 धावा केल्या. सरफरझने 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. कसोटीत पदार्पणात सरफराजने बर्‍याच खेळाडूंना मागे टाकले. तथापि, सरफराजची ही वादळी खेळी फार काळ टिकला नाही आणि दुर्दैवाने तो धावबाद झाला. सरफराजने 66 चेंडूत 62 धावा केल्या. या दरम्यान, 9 चौकार आणि 1 षटकार मारला.

सरफराजने 48 चेंडूंवर अर्धशतक ठोकले
सरफराजने 48 चेंडूत अर्धशतकी धावा फटकावल्या आणि शिखर धवन आणि पृथ्वी शॉला मागे टाकले. खरं तर, सरफराजने संयुक्तपणे भारताच्या सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे तिसरे स्थान मिळविले आहे. पृथ्वीने 2018 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 56 चेंडूत अर्धशतक केले होते.

हार्दिक पांड्याच्या विक्रमाशी केली बरोबरी
शिखर धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडूत धावांची पन्नाशी पूर्ण केली होती. तर सरफराजने या विक्रमात हार्दिक पांड्याची बरोबरी केली आहे. 2017 मध्ये पांड्याने श्रीलंकेविरुद्ध 48 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. सरफराज आता या संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आला आहे. सरफराज खानने स्वतः पहिल्या कसोटी सामन्यात एक लहान डाव खेळून इतिहास रचला आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज